
-नांदगाव (प्रतिनिधी)- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, लेखक व शिक्षणमहर्षी प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण ,पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ज्येष्ठ शिक्षक अशोक मार्कंड, उमेश पगार, भाऊसाहेब सोनवणे, दत्तात्रेय भिलोरे,बाळासाहेब कवडे , सचिन थेटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपशिक्षक श्री राजेंद्र कदम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन कार्याचा परिचय करून देताना त्यांनी तुम्हारे 30 वर्ष माळवा प्रांतावर राज्य केले. त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली त्यामुळे त्यांना ‘पुण्यश्लोक’ उपाधी मिळाली. त्यांनी अनेक मंदिरे घाट, विहिरी, धर्मशाळा, रस्ते बांधकाम केले. परिसरातील भिल्ल व गोंड समाजातील लोकांना आपल्या सैन्यात सामील केले व प्रभावी सैन्य व्यवस्था केली हे सांगितले. उपशिक्षक सुनील सुपेकर यांनी आचार्य प्र के अत्रे यांच्या विषयी बोलताना ,अत्रे हे एक महान नाटककार होते. त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ ,’भ्रमाचा भोपळा’,’ लग्नाची बेडी’,आणि ‘तो मी नव्हेच’ ही नाटके त्यांची आजही लोकप्रिय आहेत. अत्रे यांनी ‘केशवकुमार’ या टोपण नावाने अनेक कविता लिहिल्या. ‘मी कसा झालो?’ आणि ‘कऱ्हेचे पाणी’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास अत्यंत प्रांजलपणे आणि प्रभावीपणे मांडला हे सांगितले. उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सात- बारा ( ७/१२)हा शब्द कसा प्रचलित केला तर अत्रें विषयी बोलताना त्यांनी अत्रे हे एक निर्भीड व प्रभावी पत्रकार होते ते सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
