
नांदगाव (प्रतिनिधी)गणेशोत्सवात पर्यावरण संवर्धन करणे भावी पिढीची मोठी जबाबदारी आहे.असे उद्गार पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी काढले .नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित आयोजित येथील व्ही.जे.हायस्कूल या शाळेत शाडू माती पासून गणेशमूर्ती तयार करणे कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. या विद्यालयात गेल्या १७ वर्षांपासून शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कलेच्या माध्यमातून पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्याच्या मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी विद्यालयात दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

या वर्षी या कार्यशाळेत १८७ विद्यार्थी सहभागी झाले . या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे नांदगाव चे पोलिस निरीक्षक श्री.दिगंबर भदाणे शालेय समिती अध्यक्ष संजीव धामणे,पत्रकार भगवान सोनवणे,संदीप जेजुरकर मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे ,उपमुख्याध्यापक जोगेश्वर नांदुरकर , टी.एम.भास्कर मधे,गुलाब पाटील, पालक शिक्षक संघ उपाध्यक्षा पूनम लोहाडे व पालक सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणेशाच्या मूर्तीचे व शाडू मातीचे पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले . प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे यांनी केले.प्रस्ताविकात त्यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती करून दिली. गणपती काळात पर्यावरणाला ऱ्हास,जल-ध्वनिप्रदूषण सारख्या अनिष्ठ दोषांनी ग्रासले आहे व पर्यावरणाला कशा प्रकारे धोका निर्माण झाले आहे ते कलाशिक्षक विजय चव्हाण यांनी तयार केलेल्या चित्रफितीतून दाखविण्यात आले.प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पत्रकार भगवान सोनवणे यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव चे महत्व सांगितले व अंगारकी चतुर्थी निमित्त या गणपती कार्यशाळेत येण्याचे भाग्य लाभले हे सांगून शुभेच्छा दिल्या .अध्यक्षीय भाषणात संजीव धामणे यांनी या कार्यशाळेतून विद्यार्थाचे मन,मनगट व मेंदू या तिन्ही गोष्टींना चालना मिळते व विकास होतो असे सांगितले.संदिप जेजुरकर यांनी जे विद्यार्थी चांगली गणेश मूर्ती तयार करेल त्याला पारितोषिक जाहीर केले.सूत्रसंचालन निवेदिता सांगळे यांनी केले व आभार ज्ञानेश्वर डंबाळे यांनी मानले. कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक शशिकांत खांडवी ,चंद्रकात दाभाडे ,विजय चव्हाण ,ज्ञानेश्वर डंबाळे यांनी शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखवून गणेश मूर्ती तयार करून दाखविल्या .

माती मळण्यापासून तर गणपतीचे सर्व भाग कशा पद्धतीने बनवायचे याचे बारकावे हि सांगण्यात आले यानंतर संपुर्ण दिवसभर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व विविध भावमुद्रा असलेल्या आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत विद्यार्थांनी विविध भावामुद्रेच्या एकूण १८७ गणेश मूर्ती साकारल्या.बनविलेल्या मूर्ती सुकल्यावर विद्यार्थांना रंगकाम कसे करायचे याची माहिती देऊन रंगकाम करून घेणार आहेत विद्यार्थी तयार झालेल्या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करणार आहेत .या कार्यशाळे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
