
सिन्नर ( प्रतिनिधी)आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला महामित्र दत्ता वायचळे व निवृत्ती भांगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* जगात पहिला मानव व या देशाचा मुळ मालक हा आदिवासी आहे.जल जमीन जंगल यावर आदिवासींचा अधिकार आहे.आदिवासी हा निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि निसर्गाला देव मानतो आपली आदिवासी संस्क्रुती जपतो.माणूस जस जसा प्रगत होत चालला आहे तस तशी निसर्गाची हानी होत आहे. औद्योगिकीकरण विकासामुळे पर्यावरणाचा -हास होत चाललेला आहे त्यामुळे आदिवासींचं अास्तित्व धोक्यात आलं आहे. आदिवासींच्या जल जमीन जंगल यांच्या अधिकारासाठी अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे.आदिवासींचं आस्तित्व अभादित रहावा निसर्गाची हानी रोकण्यासाठी आदिवासी वाचला तर निसर्ग वाचेल म्हणून अशा म्हणालेसंयुक्त राष्ट्र संघाने (UNO) २३ डिसेंबर १९९४ ला ठराव करून जागतिक आदिवासी दिन (International Day of the world Indigonus people) ९ आँगष्ट १९९५ रोजी साजरा करण्यात आला.आज जगात १९३ च्या वर देशांमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे.भारत सरकारने याची दखल घेऊन शासकिय पातळीवर जागतिक आदिवासी दिन साजरा करावा व शासकिय सुट्टी जाहिर करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा.काॅम्रेड हरिभाऊ तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. *या कार्यक्रमाचे सुञसंचलन विजय मुठे प्रास्थाविक लक्ष्मण तळपे तर आभार धनु गि-हे यांनी मानले*. या कार्यक्रमासाठी महामिञ दत्ता वायचळे,माजी पं.स.सभापती सुमनताई बर्डे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे काॅम्रेड हरीभाऊ तांबे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,निवृत्ती भांगरे यमुनताई भांगरे प्रकाश मदगे भगवान एकलव्य तालुका अध्यक्ष किरण भाऊ मोरे भरत भांगरे नामदेव वाजे,धनु गि-हे सिताराम मदगे बहिरू जाधव, शाम कुंदे सुरेश गोडे भिमा मदगे आदि.मोठ्या संख्येने उपस्थित होते.
