
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९६ वा दिवस
मानव जातीचे अंतिम लक्ष म्हणजे मोक्ष प्राप्त करणे, मुक्ती मिळविणे होय. याचा निःस्वार्थ कर्माच्याद्वारे लाभ करून घेणे हाच 'कर्मयोग' होय. आणि म्हणूनच प्रत्येक स्वार्थपूर्ण कार्य त्या चरम अवस्थेप्रत पोहोचण्याच्या आपल्या गतीला अवरोध करीत असते, याउलट प्रत्येक निःस्वार्थपणे केलेले कर्म आपल्याला त्या ध्येयाप्रत घेऊन जात असते. एवढ्यासाठी नीतीची हीच एकमेव व्याख्या करता येईल की, जे जे म्हणून स्वार्थपर ते ते नीती विरुद्ध आणि जे निःस्वार्थपर तेच नीतिसंगत होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य ४/५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १३ ऑगस्ट २०२५
★ १७९५ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृतीदिन (तारखेनुसार)
★ १८९० त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा “बालकवी” यांचा जन्मदिन.
★ १८९८ प्रसिध्द लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, पटकथालेखक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांचा जन्मदिन.
★ १९३६ स्वातंत्र्यसेनानी मॅडम भिखाजी रुस्तुम कामा यांचा स्मृतीदिन.
