
येवला प्रतिनिधी ( दिपक उंडे)शालेय येवला तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मुले १८५ /मुली ६१ खेळाडू सहभागी झाले. कुस्ती हा एक प्राचीन आणि मर्दानी खेळ आहे,यात दोन खेळाडू एकमेकांविरुद्ध लढतात.या खेळात डावपेच, चपळाई, आणि निर्णयक्षमता महत्त्वाची असते.कुस्ती चारोळी मातीचा गंध,अंगाला माखला,जोर, चपळाई,डाव,अंगात भिनला जिद्द, चिकाटी, जिंकण्याची आस,कुस्तीचा खेळ ,महाराष्ट्राचा अभिमान खास.तालुक्यातील २३ शाळांनी सहभाग घेतला,सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक,यांचे आभार.कुस्ती प्रकार ग्रीको रोमन /फि स्टाईल प्रकारात पार पाडल्या. राजु भाऊ लोणारी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन लोणारी क्रीडा संकुल येवला येथे करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे भोलाशेट लोणारी ,मोरे सर उपस्थित होते.स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख सागर लोणारी,विजय शिरसागर. सामना अधिकारी विजय लोणारी,शिवा बोरणारे,रोहण लोणारी, संदीप कापसे, अमोल राजगुरू/तालुका स्तरीय विजयी खेळाडूची स्वा.सै.न.ल.बलकवडे व्यायामशाळा भगुर या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अविनाश टिळे, तालुका क्रीडा अधिकारी निवयुक्त अरविंद चौधरी, भाऊसाहेब जाधव,महेश पाटील, संदीप ढाकणे, संजीवनी जाधव, आणि तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे,राजुभाऊ लोणारी (पहिलवान) उप महाराष्ट्र केसरी शुभेच्छा दिल्या.
