
नाशिक ( प्रतिनिधी )दिल दोस्ती दुनियादारी जगतातील सगरवंशीय जिरेमाळी समाजातील,बहुतांशी विविध विषय घेऊन,व्हॉट्सॲप ग्रुपवर लिहिणारे,लेखाच्या माध्यमातून,शब्दांचे चौकार, षटकार मारण्यात माहिर, नव्या जुन्या माहितीचा पट उलगडून सांगण्यात तरबेज, चुकून कुठून, कानो कानी फोनो फोनीतून, समज गैरसमजातून, कधीतरी दृष्टीकोन बदलावा लागला असेलही, अर्थात तो मनुष्य स्व:भाव आहे. तरीही ते बिनधास्त लिहितात हे विशेष असो.एवढेच नव्हे तर व्हाट्सएपच्या माध्यमातून समाजातीलच घडामोडी असतात असे नव्हे तर, ज्यातून समाजप्रबोधन होण्यासाठी आपले विचारातून आपण काही अधिक उपयोगी पडेल असे आजच्या पिढीला समजावण्याचा प्रयत्नात त्यांचे लेखन असते, घातक व्यसनापासून दूर रहाण्यासाठी,लेखनातून आपले लेखन करतांना व्यसनाधीन असलेल्या सर्व वयाच्या व्यक्तींसाठी, किंवा चुकीच्या चालीरितीबद्दल ते तळमळीने लिहितात, अडीअडचणीत असलेल्या म्हणजेच संकटातून मार्ग काढण्यासाठी समाजबांधव यांना ते मदतीचे आवाहन करतात, समाजातील सामाजिक हिताचे कार्यक्रम उदा. सेवानिवृत्ती कार्यक्रम,.गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण समारंभ, उपवर वधू वर परिचय सोहळा , यासाठी अमरावती, अकोट, पिशोर, छ. संभाजीनगर,अंतापूर इ.ठिकाणी ते जात असतात,लग्नकार्य, साखरपुडा, येथे त्यांची भेट अनेकांशी होते, सुख दुःखाच्या अडचणीत असलेल्या परिवाराला जाऊन भेटण्याच्या प्रयत्नात असतात,समाजातील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या, परदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या परिवारातील सदस्यांचा परिचय ते आपल्या लेखातून देण्याचा प्रयत्न करतात,समाजात, समाजाबाहेर होत असलेले कार्यक्रम ते आपल्या मोबाईलने चित्रित करतांना ,तेथील फोटो, व्हिडीओ ग्रुप वर देत असतात,विषयानुसार व्हॉट्सॲप किती लोक पाहातात, वाचतात, परिवर्तीत होतात ? हा भाग गौण आहे.पणं या पलिकडचे A. T. पाटील [ साहेब ] यांच्या माझ्यातील स्नेह नात्या पलीकडील मित्रत्वाचे धागे जुळून आलेत ते स्नेहबंध रेशमाचे सगर रत्न परिवाराच्या सगर रत्न अंकाच्या निमित्ताने.कोरोनात माझ्या मरतुकड्या जुन्या मेड इन चायना मोबाईल मध्ये, व्हॉट्सअपने जन्म घेतला. तो काय जन्म घेतो ? माझ्या मुलाने जुगाड लावून उपद्व्याप केला होता. आजही आहे. तेव्हा माझ्या घरा दाराला काय आनंद झाला असेल, तो शब्दात सांगणे अशक्य. कारण काय तर म्हणे, मला मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिता येऊ लागल्याचा आनंद ! मी खेडवळं माणूस यत्ता , कित्ताच्या गिरवण्यापलीकडे , फारसे ज्ञान नाही. मग काय दिवसभर मोबाईल धरून बसायचो.तेव्हा समाजाच्या एक दोन ग्रुपवर साहेबांची पोस्ट वाचण्यात यायची. मलाप्रश्न पडायचा A. T. पाटील कोण ? कुठले ? काहीच कळत नव्हते. A. T.पाटील साहेबांची छबी टिपण्यासाठी कोरोनात खूप धडपड केली, पणं जिथे खेड्यातील गावकुसाच्या बहुतांशी घरांना कडीकोयंडा होता, तिथे शहरातील फ्लॅट संस्कृती कशी अपवाद असेल ?त्यांचा माझा पहिला फोन झाला तो पहिल्या कोरोनाच्या भयाण रात्री. निमित्त होते व्हॉट्सप वरती मी लिहिलेला पहिला लेख ताहाराबादचा आठवडे बाजार व मी पाहिलेला तमाशा. तेव्हा लेख कच्चा होता, तो व्याकरण दृष्ट्या पक्का करून दिला तो A. T. पाटील यांनीच. तेथून पुढे पाटील साहेब माझ्या संपर्कात आले ते कायमचेच. मैत्रीची विन आजही घट्ट आहे. त्यांचे मुळगांव पिंपळगाव बसवंत.ता. निफाड, जि. नाशिक पिंपळगाव बसवंत,कांद्याची व द्राक्षाची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ. A. T. पाटील साहेब नोकरी निमित्त नाशकात मोक्याच्या ठिकाणी म्हणजे मेनरोड, जुनी नगरपालिका येथून काही मिनिटाच्या अंतरावर चित्रमंदिर चित्रपटग्रहाजवळ जवळजवळ २० वर्षे वास्तव्य होते,त्या काळात मोजकेच समाजबांधव नाशिकमध्ये होते, श्री.पाटील साहेब यांचे घरी समाजबांधव यांचे जाणे येणे असल्याने अनेक बांधव आठवणीने सांगतात आम्ही या घरी मुक्कामी रहात होतो, आमचे आगत स्वागत होत होते,पाटील साहेब, यांच्या परिवाराची ओळख समाजात होण्यासाठी त्यांच्या मातोश्री यांचा मोठा सहभाग आहे, मातोश्री श्रीमती इंदुमती यांचे माहेर ताहाराबाद येथील होते, त्या कै. बापूराव भाऊ साळवे, यांच्या कन्या, आज त्याचे वय ८९ आहे. नाशिक येथील घरी पाहुण्यांचे स्वागत, आणि नातेवाईक जोडण्यात त्यांनी आपले विशेष स्थान आजही जपून ठेवले आहे.समाजातील, आणि समाजाव्यतिरिक्त बांधव आजही आक्कांची भेट घेण्यासाठी आवर्जून जातात. सर्वच त्यांना आक्का म्हणून संबोधतात, त्यांची स्मरणशक्ती , श्रवणशक्ती आजही उत्तम आहे, पाटील साहेब, शेती माती, कुटुंब कबिला, गावगाड्याशी बांधिलकी ठेऊन आहेत,त्यांची नोकरी ओझर येथील लढाऊ विमान बनविणाऱ्या H.A.L.कारखान्यात होती,जवळपास ३८ वर्ष यांचा नोकरीकाळ झाला, या विमान कारखान्याच्या वसाहतीत २० वर्षे त्यांनी वास्तव्य केले,जास्तीत जास्त त्यांचे वास्तव्य हे नाशिकमध्येच आहे,पाटील साहेब आणि दोन भाऊ असे हे ऐकून तीन भाऊ विवाहित आहेत.दोन बहिणी विवाहित आणि चांगल्या परिवारात आहेत.A.T. पाटील साहेब,उंचपूरे, मध्यम बांधा, तुकतुकीत कांती, चेक्सची डिझाईन असलेले, तर कधी उभ्या रंगीत धारा असलेले डिझाइन चे शर्ट तर कधी पांढरा स्वच्छ ड्रायक्लीन केलेला कडक शर्ट, त्यावर असलेल्या मॅचिंग पॅन्ट, आणि नेहमी शर्टिंग असा पेहराव,पायात कधी सॅंडल, तर कधी शूज, कधी काळी मी बघीतलेली बेलबॉटम पॅन्ट, नंतरच्या काळात एलिफंटा काय ! नॅरोकाय ! घरी दारी कधीच लेंगा पायजाम्यात मला दिसले नाहीत. पाटील साहेब यांचे वडील कै. त्र्यंबकराव कृष्णाजी पाटील, पोलिस विभागात होते, नोकरीकाळात त्यांनी जायखेडा पोलिस स्टेशन येथे नोकरी केली, येथे त्यांच्याच बहिणी च्या म्हणजे पवार परिवाराच्या घरात त्यावेळी पोलिस स्टेशन होते, तेथे त्यांनी काही वर्षे बदली काळात काढली, नामपूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, नाशिक सरकारवाडा,भद्रकाली पोलीस स्टेशन, सिन्नर, नाशिक कंट्रोल रूम, वणी, नाशिक पोलिस ट्रेंनिग कॉलेज [ P T C ] येथे कार्यकाळात त्यांचा सेवाकाल होता, निर्व्यसनी आणि शांत, उत्तम पर्सनॅलिटी असलेले, तसेच १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात सजा भोगलेले महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्य सैनिक म्हणून गौरविले गेलेले असे हे व्यक्तिमत्त्व. A. T.PATIL साहेब यांची सासुरवाडी ताहाराबादचीच. कै. चिंधा दगा महाजन उर्फ तात्याश्री यांचे जावई, सौ. लता ताईचे भाळीच्या गोंदणावरचे कुंकु. असो तो भाग वेगळा !पाटलांच्या डोक्याच्या काळ्या कुळकुळीत केसांच्या भांगाची विशिष्ट ठेवणं आजही जपून आहेत. छोटा कंगवा पँन्टीच्या खिशात नेहमीच बाळगून असतात.पँटच्या दोन खिशात दोन हातरुमाल,डोळ्यावर नंबरचा चष्मा, तो अनेकांच्या अनेक चमत्कारीक, नैसर्गिकरित्या निसर्गाशी निगडीत प्रसंग काय ? सामाजिक विधायक एक ना अनेक प्रसंग नव्हेच तर सिने नाट्यच काय ऑर्केस्ट्रामधील नवज्योत गायकांची दर्दभरी गाणी सुद्धा नजरकैद करतो. असा त्यांचा थ्रीडी पेक्षा कल्पक चष्मा आहे. तो कोणत्या अँगलने काय पाहिल याचा नेम नाही असो. चार मित्रात स्वःता गाणे गात होते असे ऐकले आहे, गाण्याची कुळकथा त्यांना ज्ञात असते. पाटील सर क्लासिकल दर्दभरी गीतांचे खास शौकीन आहेत. सैगल , रफी, मुकेश, मन्नाडे, किशोरदा ,सोनू निगम पर्यंत, नुरजहा ,हेमंतकुमार, मंगेशकर भगिनी नव्हे सुमण कल्याणपूरकरच काय आजच्या जवळ जवळ सर्वच गायक गायीकांच्या ताल सुर ठेका यांच्या समन्वयातील , बहुतांशी गायकांचे, आणि त्यांच्या गीतांचे ते चाहते आहेत. फिल्म सुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र पासून ते नागराज मंजुळेच्या अलिकडील फँड्री , सैराट , नाळ पर्यंत, बहुतांशी चित्रपटांचे स्टोरी रायटर ते डायरेक्टर , सिंगर , ते म्युझिक मास्टर पर्यंत सखोल माहिती ठेवण्यात माहिर आहेत.आपल्या समाजात साहित्यिकांची कलावंताची गायकांची कमतरता नाही. पण चारदोन नावा पलीकडे फारसे माहित नाही. गाण्यांच्या क्षेत्रात सेवानिवृत्त पो. अधिकारी श्री कैलाश तानकर, कार्यरत पो. अधिकारी श्री देवीदास घरटे , श्री प्रदीप वाघ सौ.वृषाली गोळेसर, हर्षद गोळेसर, यांच्याही पलिकडे अजून काही असू शकतील ते आपणास माहीत नाहीत.या सर्वांचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. या सर्वांची दखल पाटील साहेब व मी घेतच असतो. आपण आपल्या माणसांचे चांगले गुणगाण कौतुक करायला कुणाची हरकत नसावी. या मताचे पाटील साहेब आहेत. आपण दुसऱ्याला मोठे केली की आपसुकच आपण मोठे होतो. ग्रुपवर लिहिणारे समाज बांधव से. नि. पो. अ. किशोर घरटे साहेब, रामकृष्ण पाटील, प्रा. डी. टी. पाटील, ज्ञानेश्वर खैरनार, सुधाकर साळवे, गजानन साळवे, शिवाजी नांदगावकर साहेब,दिनकरराव तानकर साहेब, ललित साळवे, मी स्वःता अधुन मधून लिहितो. तसे बरेच लिहितात पण नावे ज्ञात नाहीत. कधी कुणी नाहीच लिहिले तर या सर्वांची उणिव पाटील साहेब भरून काढतात हे विशेष !पाटील साहेब सुसंस्कृत कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व म्हणून नात्यात परिचित आहेत. हिंदु धर्म शास्त्रातले सर्व व्रत वैकल्य सेवाभावी वृत्तीने करतात. व्यक्ति तितक्या प्रकृती असतात समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम आवर्जून करतात.पाटील साहेबांनी अनेक लहानमोठ्या समाज बांधवांचे सुख सोहळ्याचे वर्णन अप्रतिम केल्याचे आपण सर्वांनीच अनुभवले असावे. माझ्याही बाबतीत त्यांनी कुठेच कसूर केली नाही. आपला सगर रत्न विशेषांक , सगर सेवार्थी व्यक्ति विशेष , सगर दीपोत्सव, गावगाडा , परिसस्पर्श सर्वच साहित्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे. असे आपले स्मितभाषी, सालस, लोभस, सर्वक्षेत्रात पारंगत, शांत सु स्व:भावी, टुरिंग टॉकीजच्या ३५ एम.एम. पडद्यापासून ते आजच्या मल्टीप्लेक्सच्या ७० एम. एम. मल्टीनॅशनल चित्रपटांचे चाहते कलारसिक A T पाटील.उर्फ आण्णाश्री यांच्या सोबत अनेक सुख सोहळ्याच्या कार्यक्रमांना सोबत जाण्याचा मला योग आला आहे. नात्या पलिकडील मैत्रीच्या दुनियेतील दिलदार मनाच्या A. T. पाटलांना आपल्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी सगर दीपोत्सव २०२५ परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.माहितीचा स्त्रोतA. T. पाटील नाशिकशब्दसंपदा संकलन संपादकगावगाडाकर साहेबराव नंदन तात्या ताहाराबादकर नाशिक.
