
मनमाड (वार्ताहर ) सेंट झेवियर हायस्कूल मनमाड, येथे नांदगाव तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी नाईकवाडे साहेब, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्रसाद पंचवाघ , छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता पोतदार विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर मॅलकम नातो उपस्थित होते. नांदगाव तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बच्छाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार अधिकारी नाईकवाडे साहेब यांनी विज्ञान मेळाव्याचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद चिंचोले यांनी यांनी क्वांटम युग संभाव्यता आणि आव्हाने यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश नान्नोर यांनी केले व आभार अंजली झेवियर यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅलकम नातो, सर्व विज्ञान शिक्षक , विज्ञान अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी शाळेतील सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर नियोजन केले . प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना प्रमाणपत्र वाटप करून प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देखील देण्यात आली
.*नांदगाव तालुकास्तरीय विज्ञान मेळावा 2025-26 निकाल खालील प्रमाणे**
प्रथम क्रमांक*—वेदिका संजय जाधव न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव
*द्वितीय क्रमांक*—-गायकवाड आसावरी ज्ञानेश्वर
व्ही, जे ,हायस्कूल नांदगाव.
तृतीय क्रमांक*–सिद्धेश मंगेश वाणीछत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड*
उत्तेजनार्थ*. स्वामिनी हेमंत कातकडे
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड
कार्यक्रमास ज्येष्ठ विज्ञान शिक्षक व खजिनदार व्ही.जी. कदम, उपाध्यक्ष उमेश पाटील, सदस्य आत्माराम बोरसे, सौ देसले ए.बी., सौंदाणे जे .व्ही., सौ . कायस्थ व्ही.बी., श्रीमती सांगळे दि.द., माताडे जी. व्ही ., साजिद खान., एस .पी. मगर उपस्थित होते
