
.उरण दि १२(विठ्ठल ममताबादे ) समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सामाजिक जीवन व्यवस्थित चालवण्यासाठी सामाजिक संस्था कार्यरत असतात. या संस्था समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. गरीब गरजू दुर्बल घटकांना विविध सामाजिक संस्था आपल्या सामाजिक उपक्रमातून आधार देत असतात. त्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्याच्या बाबतीत या संस्था सामाजिक बांधिलकीची जाणिवेतून आपले योगदान देत असतात.असेच संस्था उरण मध्ये कार्यरत आहेत.त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सुरु आहेत.

उरण तालुक्यातील सामाजिक संस्था श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व जायंट्स ग्रुप ऑफ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने मुळेखंड करंजा रोड येथे महिलांसाठी मेमोग्राफी व लहान मुलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी अनेक महिला व लहान मुले बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेचे शिक्षक संजय होळकर यांनी सर्व डॉक्टरांचे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रथम शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर प्रथम महिलांचे मेमोग्राफी चाचणी करण्यात आली .तसेच डॉक्टर विकास मोरे, डॉक्टर अजय कोळी यांनी लहान मुलांची आरोग्य तपासणी केली. डॉक्टर अंकिता डेरे यांनी महिलांची मेमोग्राफीची तपासणी केली. डॉक्टर राहुल कुमार यांनी कॅन्सर संबंधी उत्तम मार्गदर्शन केले .डॉक्टर विकास मोरे यांनी स्तनपान सप्ताह निमित्त महिलांना स्तनपानाचे महत्त्व सांगितले .वात्सल्य फाउंडेशन तर्फे माधवी कोळी हिने सॅनेटरी नॅपकिन बद्दल माहिती देऊन सॅनेटरी नॅपकिन मोफत दिले.डॉक्टर वैभव गुरसाळे, सौजन्य फिरोज पठाण यांचे सहकार्य लाभले. महिला व लहान मुले यांची जवळपास ६० जणांची आरोग्य तपासणी झाली.

मयूर मेडिकलचे दिपेश शहा यांच्या सौजन्याने मोफत औषध देण्यात आली.या उपक्रमासाठी श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या कार्याध्यक्ष व जायंट्स ग्रुप ऑफ उरण अध्यक्ष संगीताताई ढेरे (रायगड भूषण),कविता म्हात्रे, वैशाली पाटील, तृप्ती भोईर ,मंजू कुमार, सचिन ढेरे, जायंट्स ग्रुप ऑफ उरण माजी अध्यक्ष देवेंद्र पिंपळे, रोशनलाल मेहता ,प्रियवंदा तांबोटकर, मुख्याध्यापक अमृत ठाकूर,संजय होळकर ,अनु पाटील अध्यक्ष सागरी किनारा महिला प्रभाग संघ, सहकारी नयना पाटील ,निशा म्हात्रे, तृप्ती घरत, सुप्रभा म्हात्रे ,उज्वला म्हात्रे राम मदने या सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
