
म्हसदी ता साक्री(प्रतिनिधी ) येथिल सी डी देवरे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा संजय सूर्यवंशी यांनी खुल्या गटातून वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला.जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने .संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने नाशिक विभागात खुल्या गटासाठी या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आदिवासी महिलांचे सबलीकरण या विषयावर संजय सूर्यवंशी यांनी आपले वकृत्व सादर केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ रघुनाथ भोये यांच्या हस्ते संजय सूर्यवंशी यांना प्रमाणपत्र ,मेडल,स्मृतीचिन्ह व एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.त्यांना प्राचार्य एस ए देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि पालक बंधू भगिनींनी प्रा संजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन व कौतुक केले.प्रा संजय सूर्यवंशी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*
