

मनमाड (प्रतिनिधी)..आमदार सुहास(आण्णा) कांदे यांच्या शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगाव नाका, मनमाड येथे युवासेना जिल्हाप्रमुख, मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाचे सदस्य मा. श्री फरहान(दादा) खान यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ५.०० या वेळेत हा सोहळा पार पडणार असून, यावेळेत फरहान(दादा) खान उपस्थित राहणार आहेत.या विशेष दिनानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ देखील होणार आहे. कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शिवसेना मनमाड शहर यांनी केले आहे.
