
विज्ञान छंद मंडळाच्या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक एकनाथ भुसारे.याप्रसंगी प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर, पर्यवेक्षक संजय हांडगे,विज्ञान शिक्षक व विद्यार्थीउपस्थित होते
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे शालेय विज्ञान छंद मंडळाची स्थापना व उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मविप्र संस्थेचे माजी मुख्याध्यापक एकनाथ भुसारे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे, ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका स्वाती होळकर,क्रांतीदेवी देवरे,प्रमोद पगार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी विज्ञान छंद मंडळाची रूपरेषा व आजच्या युगातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले.आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.तंत्रज्ञान,वैद्यकीयसेवा,शेती,अंतराळ,संवादव्यवस्था,शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात विज्ञानाने प्रगतीची नवी क्षितिजे खुली केली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड, कुतूहल आणि शोधक वृत्ती विकसित व्हावी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा या उद्देशाने शाळेत “विज्ञान छंद मंडळ” स्थापन करण्यात आले आहे.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने अतिशय सुरेल आवाजात सुंदर असे स्वागत गीत,विज्ञान गीत सादर केले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी पाहुण्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व औषधी वनस्पती देऊन केला.ज्येष्ठ विज्ञान शिक्षक प्रमोद पगार यांनी मनोगत व्यक्त केले.आपल्या जीवनातील विज्ञानाचे महत्त्व त्यांनी अनेक उदाहरणे घेऊन सांगितले.यावेळी विज्ञान छंद मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.कार्यकारिणी मंडळात निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.इ.१० ब चा विद्यार्थी कु.कृष्णा बर्वे याची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.त्याने आपले मनोगत व्यक्त केले.इ.९ क ची विद्यार्थिनी कु.देवयानी भोये हिने आपले विचार व्यक्त केले.या दोन्ही विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या प्रगतीचा आढावा घेतला.प्रमुख अतिथी एकनाथ भुसारे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल तसेच चिकित्सक वृत्ती बद्दल छान मार्गदर्शन केले.नवनवीन तंत्रज्ञान आज उदयास येत आहे.ए.आय. टेक्नॉलॉजी ही अतिशय प्रगतीची टेक्नॉलॉजी आहे.सर्वच ठिकाणी या विज्ञानामुळे डिजिटल युगाचा वावर सुरू झालेला आहेत. विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता शोधक वृत्ती आणि सृजनशीलता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली पाहिजे. तसेच आधुनिक विज्ञानातील घडामोडी समजून घेऊन त्यांचा समाजहितासाठी उपयोग कसा करावा याचे शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून विज्ञानाबरोबर चालावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते विज्ञान छंद मंडळ हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले.या हस्तलिखितामध्ये विद्यार्थ्यांनी स्वलिखित विज्ञानाचे लेख व प्रयोग सादर केलेले आहेत.तसेच विज्ञान छंद मंडळ कार्यकारिणी बोर्ड यांचे उद्घाटन करण्यात आले.इ.१० वी क ची विद्यार्थीनी कु.आकांक्षा कोलते,कु.आर्यन वायचळे,कु.अक्षया आव्हाड, कु.प्रेम गायकवाड यांनी विज्ञानावर आधारित प्रयोग सादरीकरण केले.या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सायली मोरे व कल्याणी कापडणीस यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान छंद मंडळ प्रमुख वर्षा पाटील व अश्विनी वडघुले यांनी केले.आभार प्रदर्शन विज्ञान छंद मंडळ उपप्रमुख रूपाली शिंदे यांनी केले.कार्यक्रमासाठी विज्ञान छंद मंडळाचे समिती प्रमुख वर्षा पाटील,उपप्रमुख रूपाली शिंदे,ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर,प्रमोद पगार,क्रांती देवी देवरे,कल्पना देशमाने,अनुपमा पवार,सुनिता घोटेकर,योगिता रोडे,रागिनी गवळी,सोनल घडवजे,सायली मोरे,कल्याणी कापडणीस व सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
