
नांदगाव (प्रतिनिधी ) आज मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी श्री सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नांदगाव, या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नांदगाव तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस बंधूंना तिरंगा राखी बांधून रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला, यावेळी माननीय पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाणे साहेब यांनी विद्यार्थिनींनी आपले स्वतःचे संरक्षण कसे करावे, शिक्षक हा समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे, शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून नैतिक मूल्य कसे जोपासता येतील आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करता येईल, त्याचबरोबर प्रसार माध्यमांचा होणारा गैरवापर कसा टाळता येऊ शकतो यासंदर्भात विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” म्हणजेच सर्वांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्याचबरोबर आम्ही बंधू म्हणून तुमच्या संरक्षणासाठी सदैव उभे आहोत, त्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहिले पाहिजे, कठीण प्रसंग निर्माण झाल्यास स्वसंरक्षणासाठी ११२ हा नंबर डायल केला तर दहा मिनिटाच्या आत तुम्हाला पोलीस संरक्षण मिळू शकते याविषयी विद्यार्थिनींना जाणीव निर्माण करून दिली, या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री भदाणे साहेब, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी,शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विक्रम घुगे सर, प्रा. सुरसे सर तसेच प्रा. मीरा कांबळे मॅडम व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या,
