
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९९५ वा दिवस
एखादा प्रचंड वृक्ष सुंदर व परिपूर्ण फल निर्माण करतो. ते फल पक्व होऊन जमिनीवर पडते, कुजते व त्यातून भावी वृक्षाचा अंकुर वर येतो. तो वृक्ष पहिल्या वृक्षाहून कदाचित अधिक प्रचंड रूप धारण करतो. या ज्या पतनाच्या कालखंडातून आपल्याला जावे लागले तो कालखंड आवश्यकच होता. या पतनातूनच भावी काळातील भारत जन्माला येत आहे. तो अंकुरित होत असून त्याची पहिली कोवळी पाने केव्हाच बाहेर पडली आहेत आणि भविष्यातील एक बलवान, विशाल, महाकाय व ऊर्ध्वमूल असा आश्वस्त वृक्ष येथे दिसू लागलेला आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २१ श्रावण (नभमास) शके १९४७
★ श्रावण कृष्ण /वद्य ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५
★ संकष्ट /मंगळी चतुर्थी
★ १९१९ भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्मदिन.
★ १९६४ लेखक, पत्रकार, दुसर्या महायुद्धातील गुप्तहेर आणि जेम्स बाँडचा जनक इयान फ्लेमिंग यांचा स्मृतिदिन.
★ आंतरराष्ट्रीय हत्ती दिन.
★ आंतरराष्ट्रीय युवा दिन.
