
शाळेतील मुलांची सुरक्षितता हा एक गंभीर प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे.विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करण्यात शाळा कमी पडत आहे.आजचा विद्यार्थी भयभीत झाला आहे.स्वतःला असुरक्षित समजू लागला आहे.पालकांना देखील आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेची चिंता वाटायला लागली आहे.मुलांना शाळेत कसे पाठवावे? हा प्रश्न शाळांमध्ये घडत असलेल्या घटनेमुळे पालकांमध्ये निर्माण होत आहे.सुरक्षित वर्ग वातावरणाचा उद्देश मुलांना संरक्षित आणि मौल्यवान वाटणे हा आहे. चांगले सुरक्षित वर्मतवरण मुले आणि शिक्षकांमधील विश्वास वाढवते, मुलांना प्रश्न विचारण्याची आणि जोखीम घेण्याची परवानगी देते, मुलांच्या सुरक्षिततेला आणि शिक्षणाला समर्थन देते आणि मुलांच्या आत्म-अभिव्यक्ती, विविधता आणि यशांचा उत्सव साजरा करते.सुरक्षित शिक्षण वातावरण सर्व मुलांसाठी समावेशक असले पाहिजे आणि ते प्रत्येक मुलाच्या सामाजिक-भावनिक विकासाला चालना देईल आणि ज्या मुलांना आघात झाला आहे त्यांना आधार देईल.बालपणीच्या शिक्षणात खरोखर सुरक्षित शिक्षण वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे केवळ अपघात रोखण्यापलीकडे जाते. ते इतर सर्व विकासासाठी आवश्यक पाया तयार करते. जेव्हा मुलांना शारीरिकदृष्ट्या सुरक्षित आणि भावनिकदृष्ट्या समर्थित वाटते, तेव्हा ते एक्सप्लोर करण्यास, जोखीम घेण्यास आणि शिकण्यात पूर्णपणे गुंतण्यास, कुतूहल आणि लवचिकता वाढविण्यास मोकळे असतात.यासाठी शाळेचा परिसर सुंदर स्वच्छ असायला पाहिजे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शालेय परिसर राखण्याची गरज आहे.एक सुंदर परिसर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करतो. शालेय वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असतो..शाळेचा सभोतल परिसर सुंदर,स्वच्छ,नीटनेटका,असावा.शालेय परिसरामध्ये झाडे लावावीत जेणेकरून ते हिरवेगार आणि आकर्षक दिसेल.विद्यार्थ्यांना खेळ खेळता यावे म्हणून चांगले खेळाचे मैदान असावे.वर्गखोल्या सुसज्ज आणि आरामदायी असाव्यात.कॅम्पसमध्ये पुरेसे सुरक्षा उपाय असले पाहिजेत.कॅम्पसमध्ये ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा इत्यादीसारख्या इतर आवश्यक सुविधा असाव्यात.मात्र बहुतांश शाळांमध्ये स्वच्छता आढळून येत नाही. शालेय इमारतीशिवाय शाळेचा आजुबाजूचा परिसर अस्वच्छ, रानगवताने, झाडांनी आच्छादिलेला असल्याने अशा ठिकाणी हिंस्र पशूंचा व सापांचा वावर जास्त असतो.अनेक आश्रम शाळांमध्ये साप चावल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय राज्यभर ठरत आहे. गेल्या तीन वर्षांत आश्रमशाळेत अथवा घरी असताना ३५३ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. राज्यात आदिवासी विकास विभागाच्या ४९९९ शासकीय आश्रमशाळा असून, तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. सर्पदंश, विंचू चावणे, विजेचा धक्का, हृदयविकार, ताप, आजारपण, पाण्यात बुडणे अशी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे आहेत. सर्पदंश व विंचू चावल्याने मृत्यू येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.आश्रम शाळाच नव्हे तर अनेक राज्यातील सरकारी व खाजगी शाळांमध्ये विषारी साप निघाल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत.मध्य प्रदेशातील सागर येथील शासकीय कन्या उच्च माध्यानिक शाळेत गेल्या १५ दिवसात २९ विषारी साप निघाल्याची बातमी समोर आली आहे.शालेय परिसराप्रमाणेच शालेय इमारत विद्यार्थ्यांना सुरक्षितता प्रदान करणारा महत्वाचा घटक आहे.अनेक शाळांच्या इमारती धोकादायक असून शाळेच्या इमारतीची भिंत पडून कित्येक विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे.मागील महिन्यातराजस्थानमधील सरकारी शाळांची झालेली भयंकर स्थिती समोर आली होती. पिपलोडी गावात असलेल्या सरकारी शाळेचे छत अचानक कोसळले. ही दुर्घटना झालावाड जिल्ह्यातील मनोहरथाना परिसरात सकाळी दुर्घटना घडली आहे. या अपघातात सात मुलांचा मृत्यू झाला. १९ मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत.अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी आश्रम शाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.या दुर्घटनेत आणखी तीन मुली जखमी झाल्या. घटनेनंतर शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीमुलांच्या सुरक्षिततेसाठी शालेय परिसर सर्वसमावेशक असावा.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक साहित्य सुरक्षित करायला पाहिजे.भावनिक सुरक्षितता जोपासायला पाहिजे.वर्गखोली स्वच्छ, प्रकाशमान आणि वयानुसार फर्निचरने सुसज्ज असणे महत्वाचे आहे.पाल्यांना सहभागी करून घ्यायला पाहिजे.९५६१५९४३०६
