
उसवाड (प्रतिनिधी)- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या समाजदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मराठा हायस्कूल,नाशिक येथे संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी समाज दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले.याप्रसंगी शब्द हे माझिया हातातील शस्त्र आहेत, जगणे महाग झाले,शिवशाही ते लोकशाही ,शिक्षण क्रांती च्या उंबरठ्यावर, गाथा कर्मवीरांची या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले . दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एकूण 8 शाळांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये डॉ. ना.का.गायकवाड विद्यालयाची विद्यार्थिनी मृण्मयी बाळासाहेब कासव हिने प्रथम क्रमांक मिळविला . तिच्या या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.डाॅ.नितीन (भाऊ) ठाकरे ,चांदवड तालुका संचालक डॉ .सयाजीराव गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष केदु बच्छाव व सर्व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार वाघ व सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत मोरे,पर्यवेक्षक अरूण व्हडगर,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
