
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी )- राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध संस्थेवर आपल्या कर्तुत्वाच्या व सर्वांना सोबत घेऊन मोठे काम करणारी व्यक्ती तसेच विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून समाजकार्यांमध्ये सतत अग्रेसर राहिले आहे. अत्यंत प्रतिकुलातून ज्यांचे नेतृत्व आपल्यासमोर उभे राहिले असे कृष्णाजी भगत यांचे कार्य अतिशय अतुलनीय आहे असे प्रतिपादन क्रीडामंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक व सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे होते . प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॳॅड. नितीन ठाकरे, माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार, माजी अध्यक्ष अरविंद कारे, माजी आमदार सुधीर तांबे, संचालिका शालिनीताई सोनवणे , माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख हे होते. कृष्णाजी भगत व शकुंतला भगत यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी कृष्णाजी भगत यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवन कार्यावर केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी आपल्या मनोगतात भगत कुटुंबातील व पवार कुटुंबातील ऋणानुबंध याबद्दल आपले विचार मांडले व कृष्णाजी तसेच दिवंगत माजी सरचिटणीस वसंतरावजी पवार यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते . डॉक्टरांच्या विचारधारेशी अतिशय एकरूप असलेले सिन्नर तालुक्यातील व्यक्तिमत्व कृष्णाजी भगत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी कृष्णाजी भगत यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकत त्यांनी केलेल्या कार्याचा धावता आढावा घेतला. संस्थेचे सरचिटणीस .ॳॅड.नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या जडणघडणीत कृष्णाजी भगत यांचे योगदान व भगत परिवार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असल्याचे आपल्या मनोगतात सांगितले. ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांनी कृष्णाजी यांच्या जीवनातील प्रसंग सांगत भगत व वाजे कुटुंब हे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे आपल्या मनोगतातून विचार मांडले.ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या हस्ते कृष्णाजी भगत यांच्या भगिनींना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.भगत कुटुंबातील कृष्णाजी भगत यांची सून वर्षा, मेघा नातू पुष्कर व पुतणे मयूर यांनी आपले विचार मांडले. तसेच मेघा भगत यांनी आपल्या कवितातून सासरे कृष्णाजी भगत यांच्या विषयी अतिशय सुंदर कविता सांगितली. तर वर्षा भगत यांनी कुटुंब प्रमुख कसे असतात याचे अतिशय सुंदर असे उदाहरण सर्वांसमोर मांडले. कृष्णाजी भगत यांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब..कृष्णाजी भगत यांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणात सांगितले. या कुटुंबातील त्यांचा मोठा मुलगा मनोज, पुतणे मयूर, अक्षय ,रोहित ,हरी तसेच नातू आदित्य, पुष्कर, तसेच सून वर्षा शितल,मेघा ,शिवानी आदीं.सूत्रसंचालन राजेंद्र देशपांडे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर ,मविप्र संस्था सभासद , शालेय समितीचे अध्यक्ष ,आजी-माजी मुख्याध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
