
सिन्नर ( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच सिन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या वतीने आयोजित शालेय कुस्ती स्पर्धा 2025. राजर्षी शाहू महाराज तालीम संघ सिन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या,या स्पर्धेमध्ये कुमार ओंकार कपिल लोणारे याचा 77 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक आला. तसेच कुमार विवेक सुनील गोळेसर याचा 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक आला. त्याचप्रमाणे निनाद दीपक भाटजिरे याचा 60 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक आला. विजयी खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विजयी खेळाडूंना क्रीडा शिक्षक किरण मिठे व सागर नन्ने यांचे मार्गदर्शन लाभले.सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे सेक्रेटरी नामदेव लोणारे तसेच सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य मधुकर देशमुख संस्थेचे शिक्षणाधिकारी राहुल वरंदळ उप प्राचार्य एकनाथ माळी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
