
नांदगाव (प्रतिनिधी) विद्या ही अशी गोष्ट आहे की ती कोणालाही चोरता येत नाही ती प्रत्येक व्यक्ती आत्मसात करत असतो व जीवनात यशस्वी होतो पण सध्या तो आजोबा -आजींना विसरत चालला आहे. ही खंत आहे. तुम्ही या ज्येष्ठांच्या हातुन सन्मानित होत आहात ही अभिमानाची गोष्ट असुन त्यांच्या परत फेडी साठी आपल्या आजुबाजूला असणाऱ्या ज्येष्ठांचा मान राखा , त्यांचा सन्मान करा त्यांच्याशी आदराने वागा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. नांदगाव येथील जेष्ठ नागरिक संघाने नातवाच्या भावनेतुन केलेला तुमचा सन्मान हा सर्वात मोठा सन्मान आहे.असे प्रतिपादन प्रतिष्ठित व्यापारी व युवा नेते दत्तराज छाजेड यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

या कार्यक्रमाला महावीर सुराणा, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती एकनाथ सदगीर, पुंजाराम जाधव, सुरजमल संत,श्रावण आढाव, शिवाजी गरुड, शिवाजी निकम, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने येथील विरंगुळा केंद्र लक्ष्मीनगर येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. तो सोहळ्यात नांदगाव शहरातील विविध शाळेतील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात वाबळे पुनम, ओम खैरनार,अनम नांद गालीब शेख,शेख उम्मी आमराई असिफ, रसिका सोनुसिंघ मेडतिया,श्रावणी गायकवाड,रोशनी थोरे, श्रावणी राठोड, दर्शन सोनवणे,शिव सोनवणे,अमेय फणसे,मनिषा शिंदे , जयश्री गिते,दर्शनी कुमावत,श्रृती सोनवणे,पार्थ कलंत्री,अर्थव जोशी मेधा शिंदे या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पुज्य साने गुरुजी यांच्या जगाला प्रेम अर्पावे, या प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करण्यात आले. संघाचे जेष्ठ सदस्य रंगनाथ चव्हाण गुरुजी यांनी प्रास्ताविकात जेष्ठ नागरिक संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन आम्हाला प्रोत्साहित केले व आमचे कौतुक केले ही प्रेरणा पुढील शिक्षणासाठी नक्कीच बळ देणारी आहे अशी भावना मनोगतातून रोशनी थोरे या विद्यार्थ्यांनीने व्यक्त केली. यावेळी जेष्ठ नागरिक श्रावण आढाव यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून शुभेच्छा दिल्या व उपस्थित पाहुण्यांनी देखिल भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी माणिकराव कवडे, विलास बच्छाव, रमाकांत सोनवणे, जयवंत साळवे, थोरात काका, शेषराव पाटील, अशोक पाटील, विश्वास ढोकळे, शहा काका , पत्रकार महेश पेवाल, सुरेश शेळके, विजय बडोदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. तर आभार शिवाजी निकम यांनी मानले.
