
मखमलाबाद विद्यालयातील एन.सी.सी.आर्मी व नेव्हलच्या विद्यार्थिनी भारतीय जवानांना राखी बांधताना. याप्रसंगी आर्मी ऑफिसर अशोक गावले व नेव्हल ऑफिसर दयाराम मुठाळ हे उपस्थित होते.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील एन.सी.सी.आर्मी व नेव्हलच्या विद्यार्थिनींनी भारतीय जवानांना राखी बांधून रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य रावसाहेब उशीर,पर्यवेक्षक संजय हांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

भारतीय जवानांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आर्टिलरी सेंटर नाशिक रोड येथील भारतीय जवानांना राख्या बांधण्यात आल्या.त्यानंतर आर्टिलरी सेंटर येथील कुमार मंगलम आर्मी संग्रहालय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.१९६५,१९७१ व १९९९ च्या भारत-पाक युद्धाची माहिती व त्यामध्ये वापरलेले रणगाडे,शस्त्रास्त्रे याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच कारगिल युद्धाची माहिती देणारा एक माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.या विद्यार्थ्यांना आर्मी ऑफिसर अशोक गावले व नेव्हल ऑफिसर दयाराम मुठाळ यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.

