
येवला प्रतिनिधी: (दिपक उंडे.)दिनांक ०७/०८/२०२५ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक आयोजित आंतरशालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा सर्व वयोगटातील मुले व मुली यांची स्पर्धा डी पॉल स्कूलच्या मैदानात घेण्यात आली ही शालेय फुटबॉल स्पर्धा १४ वर्षे वयोगटातील मुले व मुली, १७ वर्षे वयोगटातील मुले व मुली चारही संघांनी जिंकली१४ वयोगटात मुलींचा अंतिम सामना डी पॉल इंग्लिश मिडियम स्कूल, येवला विरुद्ध जय बाबाजी इंग्लिश मिडियम स्कूल, नगरसुल यांच्यात झाला अतिशय चुरशीच्या या सामन्यात डी पॉल इंग्लिश मिडियम स्कूलने ०-१ असा गोल टाकून जिंकला या सामन्यात डी पॉल स्कूल विजयी व जय बाबाजी स्कूल उपविजता ठरला विजयी संघातील खेळाडू कर्णधार हर्षदा मंगेश पैठणकर तसेच सेजल रूपेश सोनवणे, आलीना इम्तियाज बेग, प्रिया अविनाश भड, तेजु संदीप भुजबळ, समृद्धी भरत उळेकर, समीक्षा सोमनाथ मोरे, सिद्धी सागर गायकवाड, धनिष्का संतोष झालटे, श्रेया गणेश ठुबे, अरुंधती समीर देशमुख, सुझेन शमीम वालकर, लक्ष्मी शंकर डोंगरे, आयशा अमजद शेख, आराध्य मयूर गोरे या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली १४ वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना डी पॉल स्कूल विरुद्ध होरायझन इंग्लिश मिडियम स्कूल विरुद्ध झाला या सामन्यात डी पॉल स्कूल विजयी ठरला विजयी संघातील खेळाडू कर्णधार तुषार अर्जुन सैद तसेच शौर्य साईनाथ शिंदे, मोहम्मद जियान निसार अन्सारी, निल धनंजय नागपूरे, आदित्य मच्छिंद्र धनवटे, मयूर अशोक भालेराव, सम्यक अशोक पगारे, अनस अश्फाक अन्सारी, आयुष संदीप पवार, यश शैलेश ठाकूर, आविष्कार भरत काकड, तन्मय सिद्धार्थ निकम, राजवीर अंकुश ललवाणी, आयुष रवींद्र पगार, अयान मुशरिफ शाह, श्रेय बापूसाहेब पाबळे, रुद्र निलेश शिंदे, आर्यन मनोज खांडेकर हे खेळाडू होते १७ वर्ष मुलांच्या गटांतील महत्वाचा सामना हा अतिशय चुरशीचा झाला डी पॉल स्कूल विरुद्ध एस. एन. डी स्कूल, बाभूळगाव यांच्यात झाला डी पॉल स्कूलने अंतिम सामन्यात मयूर विजय नागरे याने गोल टाकून ०-१ असा विजय डी पॉल स्कूलने मिळवला या संघात कर्णधार पुष्कर कैलास गादीकर, साहिल युराज घनकुटे, हिमांशू जयप्रकाश कोकणे, मयूर विजय नागरे, वरद भुषण शिनकर, दर्शन शरद पुंड, साई सुदाम जमधडे, सोहम जालमसिंग वळवी, तन्मय अर्जुन सैद, स्वरूप संदीप जेजुरकर, पियुष संतोष मुंडे, शौर्य नितीन कुक्कर, भावेश विठ्ठल नागपुरे, साईराज जगन्नाथ खैरनार, वरद शाम शिंदे, आर्यन सुहास अलगट, अस्तित्व संदीप जाधव हे खेळाडू होते विजयी संघाचे व खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅथ्यू , फादर अगस्तीन सर्व सिस्टर क्रीडा शिक्षक सर्व विषय शिक्षकांनी कौतुक करून सत्कार केला
