
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राखी तयार करणे, पोस्टर मेकिंग, राखी प्रदर्शन, वृक्षाबंधन, क्रांतिदिन असे विविद्य कार्यक्रम संपन्न झाले. बहीण भावाच्या पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. या मध्ये १७० विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व कलात्मकता वाढविणे तसेच सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण संबंधित इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत वृक्ष संवर्धन विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आहे. साऱ्या सजीव सृष्टीचा आधार पर्यावरण आहे वृक्षानाच भाऊ मानून राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम संपन्न झाला. तसेच सर्व वर्गामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. क्रांती दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. कु नगमा मन्सूरी, अमृता जाधव, ज्योती महतो, स्वरांजली गोरे यांचे भाषणे झाली. उपशिक्षक आर जी शेळके यांनी रक्षाबंधन व क्रांतिदिनाची सविस्तर माहिती सांगितली

. सदर कार्यक्रमास विशेष सहकार्य उपशिक्षक एन के पाटील, एस डी नाईक,एस डी म्हात्रे उपशिक्षिका एस एस म्हात्रे व सेवकवृंदाचे लाभले. विविध स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य बी बी साळूंखे व उपस्थित सेवक वृंदाच्या शुभहस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका पाटील व आभार एच एन पाटील यांनी मानले.
