
पेठ. (प्रतिनिधी )9 ऑगस्ट रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आश्रम शाळा पेठ या ठिकाणी जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य श्री सुभाष दळवी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वांगणीच्या सरपंच श्रीमती मीराताई फुफाणे व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री जनार्दन गांगोडे तसेच माजी पोलीस पाटील हिरामण जाधव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमल दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन इशस्तवन स्वागत गीत व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थी मनोगते घेण्यात आली. आद्य क्रांतिकारक भाऊ माळेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी पेट पंचायत समितीचे माजी सभापती श्री महेश टोपले यांनी सहकार्य केले.

प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ शिक्षक श्री चंदर कवर यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व विशद केले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थिनींनी आदिवासी पेहराव करून आदिवासी नृत्य सादर केलीत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र भामरे व श्री राजेंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमल दळवी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सोपान निकम,श्री संतोष जाधव, श्री दिनकर देवरे,श्री गोरखनाथ कोटमे,श्री गोरख दाते, श्री लक्ष्मण भुरभूडे,श्री हिरामण भोये,श्री सुनील शिंदे,श्री शिंदे भाऊसाहेब, श्री योगेश गोवर्धने,श्री समाधान अहिरे तसेच हिरे,मॅडम पाटील, मॅडम,गांगुर्डे मॅडम,हर्षदा मॅडम, ठाकरे मॅडम, वाघेरे सर, मंगेश गांगोडे,सुभाष वळवी , श्रीमती गिते मॅडम, श्री हरीश चौधरी आदींनी व इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री सोपान निकम यांनी मानले.
