
चांदवड ( श्री भागवत झाल्टे, ) चांदवड तालुक्यातील सोग्रस येथे आज दुपारी घडलेल्या भीषण अपघातात शाळकरी मुलींना महामार्गावर वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात एकाचा मृत्यू 10 ते 12 मुल गंभीर जखमी ड्रायव्हर मध्यधुंद अवस्थेत आढळला जखमी पैकी समृद्धी पवार (वय 13) गंभीर जखमी असून, आदित्य गांगुर्डे (वय 04) आणि दीपक केदारे (वय 16) यांच्यासह इतर काही विद्यार्थ्यांना देखील गंभीर दुखापत झाली आहे.

चांदवड येथील रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करतांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
काही विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. रुग्णालयात डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे तात्काळ चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच तातडीने आवश्यक उपचार आणि सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी महामार्गावरील वेग मर्यादा आणि सुरक्षा उपाय याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.—
