
नाशिक (प्रतिनिधी ) स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय मोरवाडी येथे ‘युवा अनस्टॉपेबल’ या अग्रगण्य संस्थेमार्फत स्मार्ट क्लास (इ- लर्निंग) सेट प्राप्त झाला. या स्मार्ट क्लास च्या वर्गाचे उद्घाटन मुख्याध्यापिका उज्वला माळी यांनी केले. आपल्या विद्यालयाची तांत्रिक प्रगती व त्याद्वारे विद्यार्थी विकास करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले . संगणक विषय प्रमुख यशवंत गावित यांनी स्मार्ट क्लास चा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.युवा अनस्टॉपे बलचे पदाधिकारी विनोद सूर्यवंशी, संदीप हंडे माजी विद्यार्थी व हॉलिबॉल पटू भावेश कोळंबे यांच्या प्रयत्नातून विद्यालयाला १५००००रू.किंमत असलेला इ.लर्निंग सेट व मोठ्या साईजचे १५ बेंचेस प्राप्त झाले.याप्रसंगी पर्यवेक्षक कीर्तिकुमार गहाणकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

