
दि. 01ऑगस्ट 2025 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री एस. जी. राठोड साहेब व तसेच संस्थेचे सचिव सिद्धांत दादा राठोड व मुख्याध्यापक श्री आर. व्ही. जाधव सर , पर्यवेक्षक श्री पी. व्ही. चव्हाण सर (मामा) याप्रसंगी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून त्यांच्या जीवनावर पुष्पगुंपले. व काही विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या स्वयंमरचित पोवाड्यांचे गायन केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर. व्ही. जाधव सर यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर पुष्प गुंफले. त्यांनी आपल्या भाषणात ना लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला. साठे हे अवघे दीड दिवस शाळेत गेले नंतर वर्णभेदाद्वारे होणाऱ्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या प्रकारचे विचार त्यांनी आपल्या भाषणात न व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज गर्जे सर यांनी केले. तसेच यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
