
सिन्नर (प्रतिनिधी )१ ऑगस्ट २०२५ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांनी दलित आणि माहाराष्ट्रातील ग्रामीण लोकांच्या जीवनावर आधारित साहित्य निर्माण केले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय भूमिका बजावली.प्रमाणात कथा, कादंबन्या, लावणी, पोवाडे लिहून मराठी साहित्यात आपले अढळ स्थान निर्माण केले. ज्यांनी आपल्या लेखनातून दलित व कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली, ज्यानी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले.

अस्पृख मांग समाजात झाला.त्यांचे जातीव्यवस्था, गरीबी आणि भेदभावामुळे अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊ साठे यांनी केवळ दीड दिवसातच शाळा सोडली त्यांना पुढे जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते सुञसंचलन डाॅ विजय लोहारकर यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार रुपेश मुठे यांनी मानले*यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे,डाॅ विजय लोहारकर बाळासाहेब जाधव, जगन्नाथ वरंदळ, आकाश धोंगडे, किशोर बोऱ्हाडे, प्रभाकर गाडेकर, किसन माहत्मे स्वानवीर कुशवा,गोपीनाथ वाजे,अशोक आव्हाड, अमोल शेवाळे,भगवान पाचोरे,अनिल सोनवणे,पोपट साळचे,साईनाथ आस्वरे, प्रकाश माळी मनोज माळी,दिलीप वारुंगसे आदी उपस्थित होते
