
रावळगाव :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. १२ मार्च २०२५ रोजी ग्रंथालयशास्त्र विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज हे उपस्थित होते. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबादास पाचंगे, प्रास्ताविक प्रा. वर्षा पवार यांनी केले, त्यात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याची माहिती दिली, तर आभार प्रदर्शन ग्रंथालयशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अविनाश चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये असहकार चळवळ, चलेजाव चळवळ अशा अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग घेवून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची धार मजबूत केली, भारताच्या स्वातंत्र्य नंतर त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय असून, महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पुढील काळात त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्यानतर तेथील त्यांचे कार्य ही महत्वाचे राहिले असून, आजच्या महाराष्ट्राच्या प्रगतीची बीजे यशवंतराव चव्हाणांनी पेरली होती, त्यामुळेच आजच्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास दिसून येतो, असे प्रतिपादन या प्रसंगी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर, प्रा. शरद आंबेकर, प्रा. मनीष ठोके, प्रा. प्रशांत निकम, प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा.प्रियंका भामरे, प्रा.चेतना हिरे, प्रा.कावेरी जाधव, प्रा.पायाल गायकवाड, प्रा. नेहा गांगुर्डे, यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

