
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात यशवंतराव चव्हाण व अँड बाबुरावजी ठाकरे कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य दवंगे व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी )ता 12- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व मविप्र संस्थेचे माजी सरचिटणीस ॲड बाबुरावजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, अभिनव मुख्याध्यापक राहुल मोगल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक भारत मोगल यांनी केले अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी यशवंतराव चव्हाण व बाबुराव ठाकरे यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले सूत्रसंचालन व आभार क्रीडा शिक्षक बाळासाहेब गडाख यांनी केले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते
