
नांदगाव ( प्रतिनिधी ):- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे कर्मवीर ॲड. बाबुराव ठाकरे व स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात श्रीमती काळे मॅडम म्हणाले, कर्मवीर बाबुराव ठाकरे 25 वर्ष नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. शिक्षण सेवाभाव आणि ध्येयवादाच्या बळावर त्यांनी मोठेपण सिद्ध केले. मविप्रचे सरचिटणीस अध्यक्ष या पदांचा कालावधी सत्कारणी लावला. तसेच माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले. नाशिक जिल्हा न्यायालयासमोर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला. मविप्र संस्थेतर्फे अमृत महोत्सवी सोहळ्यात माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

