
नायगाव ( प्रतिनिधी ) मविप्र संचलित नायगाव येथील जनता विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे आधारस्तंभ कर्मवीर ॲड.बाबुराव ठाकरे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब कलकत्ते होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी समीक्षा सोनवणे या विद्यार्थिनीने या महान नेत्यांच्या कार्याला अभिवादन केले. श्रीमती माधुरी भगत यांनी आपल्या मनोगतातून या महान विभूतींच्या कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बाबासाहेब कलकत्ते यांनी ॲड.बाबुराव ठाकरे तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या शैक्षणिक,सामाजिक तसेच राजकीय कार्याविषयी विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी नाठे हिने तर आभार प्रदर्शन धनश्री साठे हिने केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता सहावी ‘ब’च्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते….फोटो:- जनता विद्यालय येथे ॲड.बाबुराव ठाकरे व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य आणि उपस्थित सर्व शिक्षक…….
