
समाज उपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच समाज लक्षात ठेवतो. दत्ताभाऊ वायचळे प्रतिनिधी सिन्नर, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा हायस्कूल, सिन्नर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोमनाथ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाने, प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी, महामित्र, नायब तहसीलदार दत्ताभाऊ वायचळे, पर्यवेक्षक श्री. जयवंत महाले यांच्या उपस्थितीत भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आला होता.

विद्यालयातील पर्यवेक्षक श्री. जयवंत महाले यांनी प्रास्ताविकातून कारगिल दिनाची माहिती देत भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या कार्याची माहिती दिली. प्रमुख अतिथी दत्ताभाऊ वायचळे भिकुसा यमासा क्षत्रिय यांच्या कार्याची माहिती देत स्वातंत्र्यपूर्व काळातील नव उद्योगाची माहिती दिली. तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीसाठी दिलेल्या शैक्षणिक देणग्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. समाज उपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच समाज लक्षात ठेवतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात समाज उपयोगी कार्य करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोमनाथ जगदाळे यांनी भिकुसा बाबांच्या व्यवसायाची माहिती देत, बिडी कामगारांच्या मुलांना शिक्षण संकुल उभे केले. त्यांच्यामुळेच आपण आज आनंदायी शिक्षण घेत आहोत अशी माहिती दिली.

आदरणीय डॉक्टर दीप्ती देशपांडे मॅडम सचिव, गोखले एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रभाकर बोडके यांनी केले. मान्यवरांचे आभार जेष्ठ शिक्षक श्री. प्रशांत तळेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
