
सिन्नर (प्रतिनिधी)यशवंतराव एक सुसंस्कृत व आदर्श व्यक्तिमत्व होते, त्यांचे कार्य आजच्या राजकारण्यांना प्रेरणादायी व दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि: षालशिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले.येथील पंचायत समितीच्या प्रांगणात उभारलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धा कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमत्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समविचारी सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात झळके बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा पदाधिकारी तसेच पक्षाचे मा.शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची माहिती दिली.यावेळी रामनाथ झगडे, दत्ताराम दोमाडे, पेमराज गडाख, विनायक लहामगे,अर्जुन उगले,किसन उगले,उद्धव गोसावी,भाऊसाहेब हांडोरे,दिनकर थोरात, बाळू आव्हाड,पांडुरंग सोनवणे आदी उपस्थित होते.
