
सिन्नर ( प्रतिनिधी )येथे पंचायत समितीच्या कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सिन्नर महामित्र परिवार,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड याच्या संयुक्त वतीने जयंती साजरी करण्यात आली यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला* महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर काम केली. हा पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना १९७७-७८ ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या.यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत.यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला.जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. . शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले , यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवानी, महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रल्हाद बिब्बे प्रास्ताविक विजयकुमार ढवळेकार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी अशोक भवारी होतेतर आभार विजय मुठे यांनी मानलेया प्रसंगी गटविकास अधिकारी अशोक भवारी महामित्र दत्ता वायचळे,सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार ढवळे,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे, निलेश भुजाड कनिष्ठ प्रशासन अधिकारी शेवाळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी ललिता जाधव आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, महिला कर्मचारी सुनिता सांगळे, संध्या पवार,गुंजाळ मॅडम अरुण सांगळे,रंजन थोरमीसे कैलास आव्हाड आदि उपस्थित होते
