
भालूर (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व भाजपचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २२ जूलै २०२५ रोजी भालूर मंडलाच्या वतीने हिसवळ खु. येथे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. भाजपा प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांचे संकल्पनेतून राज्यभर महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगानेच नांदगाव भाजपा भालूर मंडलातर्फे हिसवळ खु. येथे गणेश मंदिरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. तालुका अध्यक्ष श्रीमती मनिषा भारत काकड यांनी स्वतः रक्तदान करून शिबीराचे उद्घाटन केले. तसेच भारत काकड, तालुका उपाध्यक्ष बबनराव नाईकवाडे, भाऊलाल सदगीर, सरचिटणीस राजेंद्र कदम, युवा मोर्चा मनोज काकळीज,नितीन चव्हाण, ज्ञानेश्वर व्हर्गळ, गणेश काजीकर, समाधान डगळे, रामकृष्ण हेंबाडे, सोमनाथ शिंदे यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. त्याचप्रमाणे जनतेतूनही मोठ्या प्रमाणावर शिबीराला प्रतिसाद मिळाला. अॅड जयश्रीताई दौंड यांचेसह संजय आहेर, शिवाजी कराडे यांनी शिबीराला भेट दिली. शिबीराचे यशस्वीतेसाठी तालुका सरचिटणीस अशोक आयनोर, यांचेसह किशोर आहेर, योगेश आहेर, शानुभाऊ भालेराव, चांगदेव वाघ, हरी उगले, विजय देशमुख, श्रावण हेंबाडे सचिन थेटे, कचरू सांगळे, गोरख थेटे, संदिप कराड, रामेश्वर निकम, कल्याण सदगीर, रामदास पवार, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
