
गावदरा (प्रतिनिधी )आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा येथे पर्यावरण पूरक होळी हा उपक्रम राबविण्यात आला. ह्यावेळी S R DALAVI ( I ) FOUNDATION यांच्या संकल्पनेतून NANDGAON TCHR FORUM (NASHIK ) यांनी यंदाची होळीला निसर्ग संवर्धनाचा संकल्प करण्यात आला तसेच वृक्षतोड थांबवूया आणि निसर्ग रंग वापरूया, पाणी वाचवूया आणि प्रदूषण मुक्त पर्यावरण पूरक सण साजरा करू या अशी शपथ घेण्यात आली.श्री विलास सोनवणे यांनी पर्यावरणाचे महत्व विदयार्थ्यांना समजावून दिले. एस. आर. फाउंडेशन नेहमी विविध उपक्रम राबवित असते. त्यांच्या अशा अनेक उपक्रम राज्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या उपक्रमात आम्ही सहभागी आहोत.ह्या उपक्रमाला श्री पंकज सोनवणे,श्री प्रविण पाटील, श्रीम. मनीषा देवरे, श्रीम. अनिता देवराज ह्या नांदगाव टीमचे विशेष सहकार्य लाभले.
