
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८४३ वा दिवस सर्व जगात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मूर्तीपूजन सुरू आहे, असे तुम्हाला दिसून येईल. काहीजण मनुष्य रूपातील देवाची आराधना करतात, तर काही मनुष्याने घडविलेल्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतात. मनुष्यरुपाची पूजा हा सर्वोत्तम मार्ग आहे. मला जर सगुणभक्ती करायची असेल तर देव एखाद्या प्राण्याच्या, वस्तूच्या किंवा अन्य कोणत्या तरी रूपात पाहण्यापेक्षा मनुष्य रुपात पाहणे मला जास्त आवडेल. एका संप्रदायाला परमेश्वराचे जे सगुणरूप प्रिय आहे ते दुसऱ्या संप्रदायाला प्रिय वाटेलच असे नाही. मूर्तीपूजेमध्ये हाच मोठा दोष आहे. तरीही ईश्वराकडे जाण्याची ती एक पायरी म्हणून तिची आवश्यकता वाटते.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २१ फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ बुधवार दि. १२ मार्च २०२५
★ १९१३ भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिन
★ १९३० महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती पासून २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
★ १९९९ नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.
