
ओझर: दि.१२ वार्ताहर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष व सरचिटणीस ॲड बाबुराव ठाकरें व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कर्मवीर ॲड बाबुराव ठाकरे यांच्या जीवन कार्यावर भाषणे केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी कर्मवीर ठाकरे, कै. यशवंतराव चव्हाण यांचा जीवन परिचय सविस्तर उलगडून सांगितला. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदाप्रमाणे कर्मवीर ॲड ठाकरेंनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी संस्थेचे सरचिटणीस व अध्यक्ष असतांना आपली वकिली सांभाळून नाशिक जिल्ह्यात अनेक शाळा सुरू केल्या. मविप्र संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.
