
गणुर( प्रतिनिधी). कर्म. ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे, जनता विद्यालय गणुर. या विद्यालयात आज दिनांक 12 मार्च 2025 वार बुधवार रोजी गावचे भूमिपुत्र कर्म.ॲड बाबुराव गणपतराव ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. अशोक काका सवंद्रे तसेच सदस्य श्री. शंकर त्र्यंबक ठाकरे तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माधव कारभारी ठाकरे यांनी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमासाठी शालेय समिती, शाळेच्या माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
