
*सरस्व मुळडोंगरी (प्रतिनिधी ) : सरस्वती माध्यमिक विदयालय मुळडोंगरी विद्यालयात धर्मवीर संभाजी महाराज यांची पुण्यतिथी बलिदान दिन हा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.जे.राठोड साहेब व संस्थेचे सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाचा मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस.चव्हाण मॅडम यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण केला.

यावेळी विद्यालयातील शिक्षक श्री एम. ई.जाधव सर यांनी छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगभर शौर्य आणि स्वराज्याची रक्षक म्हणून छाव्याच्या माध्यमातून आपल्याला यांची साता समुद्रा पल्याड असलेले ज्यांची प्रचिती आपल्या लक्षात येते असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेचे वर्णन यांनी आपल्या भाषणातुन व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

