
नाशिक (प्रतिनिधी )भिमाबाई जोंधळे यांच्या पुस्तकांचं हॉटेल नाशिक येथे साहित्यरंग साहित्य मंच आयोजित निमंत्रितांचा राज्यस्तरीय आषाढ पावसाळी कविसंमेलन व सन्मान सोहळा रविवारी संपन्न झाला. युवा साहित्यक सुशिलकुमार शिंदे आयोजित संमेलन अतिशय देखणे, यादगार आणि ऊर्जा व प्रेरणादायक ठरले. कविसंमेलनात उत्कृष्ट कवितेला १ते३ क्रमांक जाहीर केले. यात मराठा विद्या प्रसारक समाजाचे सेवानिवृत्त प्रबंधक व मविप्र निवृत्त सेवक संघाचे सचिव जेष्ठ कवी माणिकराव गोडसे यांच्या कविता-सादरीकरणाला प्रथम क्रमांक जाहिर होऊन भिमाबाई जोंधळे, डॉ.प्रतिभा देशमुख-चौरे, प्रा.आशा बिरारी-पाटील, सुहास टिपरे, सुशिलकुमार शिंदे सीमाराणी बागुल, बाळासाहेब गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
