

महाळुंगे पडवळ(प्रतिनिधी) महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुनील पाटीलबुवा वाळुंज तर व्हाईस चेअरमन पदी श्रद्धा सुधाकर आवटे (पडवळ) यांची बिनविरोध निवड झाली असून त्याच्या निवडीनंतर महाळुंगे पडवळ ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सुनील वाळुंज यांनी पुढील काळात श्रीदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणार असून संस्था वाढीसाठी काम करणार आहे. तसेच संस्थेतून कर्ज घेतलेल्या कर्जदारांनी वेळेत कर्ज भरावे त्यासाठी संचालकांनी पाठपुरावा करावा आपल्या संस्थेला नेहमी ऑडिट वर्ग (अ )मिळत असून तो कायमस्वरूपी राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे असे सांगितले. तर व्हाईस चेअरमन श्रद्धा आवटे यांनी सर्व संचालक मंडळाने मला व्हाईस चेअरमनपदी काम करण्याची संधी दिली या संधीचे सोने करेल आपली संस्था प्रगतीपथावर कशी जाईल यासाठी काम करेल असे सांगितले.यावेळी संस्थेचे संस्थापक श्रीहरी पडवळ माजी चेअरमन एकनाथ आंबटकर, सरपंच सुजाता चासकर, पतसंस्थेचे संचालक जिजाभाऊ आवटे, सोमनाथ घोडेकर, पंढरीनाथ चासकर, योगेश पडवळ, दिलिप सैद, रोहिणी चासकर, अशोक डोके, काशिनाथ शिंदे, याकुब भाई इनामदार, माजी सरपंच शिवाजी चासकर,सुभाष दादा पडवळ, (भाऊसाहेब) तबाजी पडवळ, हेमंत पडवळ गुरुजी, अनिल पडवळ, दादाभाऊ चासकर, सुदाम पडवळ, विशाल डोके, साईनाथ चासकर, विठ्ठल चासकर, गुलाब पडवळ, माणिक सैद, सिताराम सैद, सचिन चासकर, बाळासाहेब आंबटकर, उदय आंबटकर, राहुल पडवळ, आनंदराव वाळुंज, एन.डी चासकर, बाबाजी चासकर, सुभाष पडवळ, सुरज पडवळ, राजन चासकर, तानाजी चासकर, रामहरी पडवळ, भरत पडवळ, चंद्रकांत जाधव, माऊली घोडेकर, मल्हारी चासकर, आप्पाजी आवटे, बाळू जाधव यासह समस्त ग्रामस्थ महाळुंगे पडवळ उपस्थित होते.
