
सिन्नर ( प्रतिनिधी )१०मार्च २०२५ क्रांतीज्योती साविञीमाई फूले यांच्या १२८ व्या स्मृतिदिन सिन्नर येथे महामित्र परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड अ. भा. आदिवासी विकास परिषद व सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संघटना यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले*सुत्रसंचलन अमोल गवारी,प्रास्ताविक विजय मुठे आभार रुपेश मुठे यांनी मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे भारतातील पहिल्या महिला शिक्षका, मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले . . स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात त्या काळात सावित्रीबाई जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला. लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीमाईना ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता व सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला अशा महान विद्येच्या ख-या देवता साविञीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन या प्रसंगी विजय मुठे,अमोल गवारी, रुपेश मुठे,रविंद्र कांबळे यांनी साविञीमाई फुले जीवनातील संघर्ष प्रसंग आपले मनोगत व्यक्त केलेयावेळी मातृशक्ती हिराबाई मुठे,रंजनाबाई मुठे महामित्र दत्ता वायचळे, माजी नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,ट्रायबल आमीॅ अध्यक्ष अमोल गवारी प्रा.रविंद्र कांबळे सर बाळासाहेब मुठे,योगेश क्षत्रिय, कोंडाजी पवार, गोंविद,लहामगे आदि उपस्थित होते
