
नांदगाव (प्रतिनिधी) येथील श्री सिध्दी विनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन समिती नांदगाव शाखेची नुकतीच अंनिस चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेन गोराणे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजातील अंधश्रद्धा निर्मुलन करणे काळाची गरज आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजाला घातक ठरतील अश्या रुढींना विरोध करणे आवश्यक आहे. चमत्कार, भोंदूगिरीतून अनेक अडाणी समाजाला लुटले जाते आहे. यासाठी आपण ती लुट थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत. व दर आठवड्याला कार्यकत्यांची बैठक घेऊन विचार विनिमय करावा. असा संदेश या बैठकीत डॉ. ठकसेन गोराणे यांनी दिला.

या वेळी अंनिस चे पदाधिकारी भगिरथ जेजूरकर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा बैठकीत देण्यात आल्या व त्यांचा डाॅ. ठकसेन गोराणे, सिध्दी विनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम घुगे, अंनिस नांदगाव तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मागिल वर्षी अंनिस कडुन राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा अंनिस चे नांदगाव तालुका अध्यक्ष प्रा . सुरेश नारायणे यांनी सांगितला.

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरसे सर यांनी केले. यावेळी गोरख छल्लारे यांनी काही अंधश्रद्धा यावर आधारित प्रयोग सादर केले. या कार्यक्रमाचा एकत्रित आढावा व आभार प्राचार्य विक्रम घुगे यांनी केले. यावेळी अंनिस चे नांदगाव तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते.

