
सिन्नर (प्रतिनिधी): – डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले होते.व्यासपीठावर एस. एस.सी परीक्षा केंद्रसंचालक रामदास वाजे,पांडुरंग भाबड,सोमनाथ गिरी, कचेश्वर शिंदे, विद्या ठाकरे, पोलिस पाटील रामदास वारुंगसे, वरिष्ठ लिपिक राणी शिंदे, रोहिणी भगत आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते क्रांतीज्योती फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रातिनिधिक स्वरूपात स्त्री शिक्षिका व मुलींचा सत्कार करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य रंगनाथ उगले म्हणाले की ,सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला .मुलींना शिक्षणाची द्वारे त्यांच्यामुळे खुली झाली आहे. त्यांच्यामुळेच आज मुली शिक्षण घेत आहे

.शिक्षण घेतल्यामुळे राष्ट्रपती पदापासून ते विविध पदावर महिला कार्यरत आहे .फुले यांच्यामुळेच महिलांनी शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय, आर्थिक , कौटुंबिक तसेच विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यांचे कार्य अतुलनीय आहे म्हणून महिलांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कार्य करावे असे आव्हान प्राचार्य उगले यांनी केले . सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी केले तर आभार सोमनाथ गिरी यांनी केले.

यावेळी डी.ए.रबडे,सुनील ससाणे,मारुती डगळे, सिमा गोसावी,सुदाम वारुंगसे ,विनिता देवरे,जयश्री गोहाड, रेखा खंडीझोड ,कल्पना शिंदे आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
