
रावळगाव :-(प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय रावळगाव येथे आज दि. १० मार्च २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज हे उपस्थित होते. या प्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी निकिता पवार या विद्यार्थिनीने, प्रस्ताविक प्रा. भरत आहेर यांनी केले त्यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली, तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे यांनी केले. यावेळी सौरभ महिरे व निकिता पवार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, भारतीय समाजामध्ये जी मनुस्मृतीवर आधारित समाजव्यवस्था अस्तित्वात होती, त्यात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे स्त्रियांना माणूस म्हणून माणसासारखी वागणूक देण्यात यावी, त्यांना शिक्षण घेता यावे व भारतीय स्त्रियांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्या अंधारातून प्रकाशात याव्यात म्हणून, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले व जो संघर्ष केला तो अतिशय महत्वाचा असून, त्यांनी केलेल्या या त्यागामुळे व संघर्षामुळेच भारतीय स्त्रिया ह्या आज कला, क्रीडा, साहित्य, वाणिज्य, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, न्यायदान आशा सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला-खांदा लावून वावरतांना दिसून येतात. त्यामुळे वर्तमानात देशाने जगात जे नावलौकीकिक मिळविलेले आहे. त्यात महिलांचे सर्वच क्षेत्रातील योगदान महत्वाचे राहिलेले आहे. याचे सर्व श्रेय सावित्रीबाई फुले व महत्मा फुले या फुले दाम्पत्यांचे असून, त्यामुळे आजच्या तरुणाईने त्यांच्या विचारांचे खरे वारसदार व्हावे, असे प्रतिपादन या प्रसंगी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. गीतांजली खैरनार, प्रा. मोहिनी निकम, प्रा. सारिका सोनवणे, प्रा.प्रियंका भामरे, प्रा.चेतना हिरे, प्रा.कावेरी जाधव, प्रा.पायाल गायकवाड, प्रा.राज ठाकरे, प्रा. प्रशांत निकम, कमलेश अहिरे, गिरीश पवार, चेतन पवार, किरण बच्छाव यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छायाचित्र एक – सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्या समवेत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी.छायाचित्र दोन- अध्यक्षीयमनोगत व्यक्त करतना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्या समवेत डावीकडून प्रा. भरत आहेर, प्रा. गीतांजली खैरनार
