
नाशिक (प्रतिनिधी).६ मार्च हा स्वर्गीय रत्नप्रभा प्रभाकर वैशंपायन तथा आईसाहेब यांचा स्मृतिदिन दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट , नाशिक या संस्थेमध्ये मातृदिन म्हणून साजरा केला जातो… या निमित्ताने डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल व जुनिअर कॉलेज व वाय.डी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या शाळांमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते….. सूर्यनमस्कार स्पर्धेतून पाच विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करून त्यांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले . स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.प्रकाशजी वैशंपायन, उपाध्यक्ष श्री.प्रभाकर कुलकर्णी, सेक्रेटरी श्री.हेमंत बरकले ,डी.डी.बिटको शाळेचे चेअरमन श्री रोहितजी वैशंपायन वाय.डी.बिटकोचे चेअरमन श्री. रमेश महाशब्दे यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाप्रसंगी स्पर्धेचे संयोजक संस्थेचे माजी ग.कौ. सदस्य प्रा. किरण कवीश्वर , डी.डी बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री पेंढारकर, वाय.डी.बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.सविता कुशारे , संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य सौ. अमृता कवीश्वर, श्री.दिनेश जाधव श्री.अनिल ठाकरे ,श्री. के.डी बागुल, सौ. भारती चंद्रात्रे ,जॉईंट सेक्रेटरी सौ.शीतल लिंडायत, डॉ. विलास देवरे, योगशिक्षक श्री जाधव सर , उपमुख्याध्यापक श्री.परशराम पुंड , पर्यवेक्षक श्री राजेंद्र सोमवंशी आदि मान्यवर उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


