
. नांदगाव (प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सण २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेच्या आधारे ७ लाख १४ हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपनी द्वारा निकष पूर्ण करणाऱ्या गरजू व पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०२४-२५ साठी गुणवत्तेनुसार महाविद्यालयातील ८४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी आठ ते नऊ हजार रुपये याप्रमाणे ७ लाख १४ हजार रुपये जमा झाले आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे मोठा आधार मिळाला आहे. याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यातील शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीचा उपयोग होईल अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. महाविद्यालयातील पात्र व गरजू विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, श्री प्रसाद कवडे व इतर सर्व सेवकांनी विद्यार्थ्यांना मदत केली होती.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे महाविद्यालय विकास समिती व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.
