
मनमाड (प्रतिनिधी) युनेस्कोच्या गौरवामुळे शिवप्रेमाचा जल्लोष!विशेषतः अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झाल्यामुळे संपूर्ण राज्यात आणि देशभरात शिवप्रेमींसाठी हे अत्यंत गौरवाचे आणि अभिमानाचे क्षण ठरले आहेत.याच पार्श्वभूमीवर मनमाड शहर शिवसेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 13 जुलै 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेस नारळ अर्पण, पुष्पहार अर्पण आणि फटाक्यांच्या गजरात जयघोष करत शिवप्रेम, निष्ठा व अभिमान व्यक्त करण्यात आला. “छत्रपती शिवाजी महाराज की जय!” या निनादात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.या अभिवादन सोहळ्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी तसेच मनमाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा सोहळा संघटनात्मक ऐक्य, ऐतिहासिक जाणीव आणि महाराजांप्रती निष्ठा यांचे प्रतीक ठरला.जय भवानी, जय शिवाजी!—प्रेषक:मनमाड शहर शिवसेनादिनांक: 13 जुलै 2025स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज चौक, मनमाड
