
साकोरा (प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अहिल्यानगर येथे सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी स्कुल कमिटी चेअरमन तथा मा जि प सदस्य रमेश बोरसे यांची निवड झाली,त्याबद्दल स्कुल कमिटी सदस्य व्ही एस बोरसे व अण्णासाहेब काटकर,तसेच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथील श्री बी जे बोरसे व श्री विजय पांगुळ ,केबीपी विद्यालय विंचूर येथील तेज पवार सर,नामदेवराव बोरसे सेवानिवृत्त वरिष्ठ लेखनिक यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.वडिलांच्या कार्याचा समाजसेवेचा वसा ,वडिलांच्या नंतर आई ची शिकवण साकोरे येथील रयत शाखेचे ऋणानुबंध जपताना संपूर्ण कुटुंबाने तन -मन -धनाने शाखेच्या विकासात योगदान दिले,जि प सदस्य असताना 5 लाख रुपयांचे शौचालय, मैदान सपाटीकरण,सरंक्षक भिंत ,बैठकीसाठी गट्टू बसविणे व जीर्ण इमारतीच्या जागेवर 12 खोल्यांची नवनूतन इमारतीचे बांधकाम तसेच दैनंदिन शाखेतील अडचणी व प्रश्न सोडविण्यात तत्पर असणारे काका व ह्या कुटुंबाने दिलेले योगदान म्हणजे मैलाचा दगड म्हणावा लागेल ,याच कार्याची पावती म्हणून संस्थेच्या कामकाजात अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी काकांची निवड झाली असे म्हणावे लागेल.याबद्दल साकोरे पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक संघटना,व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व लोकमानसातून कौतुक व सत्काराचा वर्षाव व सदिच्छा देण्यात आला.पेडकाई माता माध्यमिक विद्यालय,जि प साकोरे ,के बी पी साकोरे,पत्रकार श्री बाबासाहेब बोरसे, श्री भगवान हिरे,श्री नारायणे सर नानाभाऊ अहिरे,साकोरे ग्रामपंचायत सरपंच श्री किरण बोरसे उपसरपंच सौ मनीषा अहिरे व सदस्य शाखाप्रेमी लोकांनी रमेश काका यांचा सन्मान केला व संस्थेचे आभार मानण्यात आले.
