
नांदगाव( प्रतिनिधी).. नांदगाव येथील शिवकन्या तसेच सामाजिक कार्यकर्त्या आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ संगिता सोनवणे यांना निफाड येथे माणुसकी फौंडेशनतर्फे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेते दगडी चाळ फेम संजय खापरे यांच्या हस्ते व डॉ शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रणरागिणीपुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ संगिता सोनवणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नांदगाव येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या निस्सीम शिवभक्त शिवकन्या यांना निफाड येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने जागितक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिनेअभिनेते संजय खापरे यांच्या हस्ते व मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका डॉ शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सोनवणे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवेबद्दल तसेच महिलांच्या विविध प्रश्नांवर काम बघुन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सोनवणे या शिवकन्या म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत त्यांना याआधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह केंद्रीय मंत्री तसेच राज्यातील अनेक सामाजिक संस्था व राजकीय पक्षाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे काल मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा लागला आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व थरातून त्यांचे कौतुक होत आहे.
